नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचा २०१९-२० या वर्षासाठी निवडण्यास आलेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांच्याकडून नुतन अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांनी पदभार स्विकारला. तसेच उपाध्यक्षपदाचा पदभार डॉ.हेमंत सोननीस, सचिवपदी, डॉ.विशाल गुंजाळ तर खजिनदारपदी डॉ. किरण शिंदे आणि महिला आघाडीप्रमुख म्हणून डॉ. गीतांजली गोंदकर यांनी पदग्रहण केले.आयएमएचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. देवरे यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शालिमार येथील आयएमएच्या जोशी सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ भुलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट, नाशिकचे माजी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आमदार डॉ राहुल आहेर आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. बालावेंकटक म्हणाले, संपूर्ण विश्वात वैद्यकीय सेवा देणारा वर्ग डॉक्टर्स हे सर्वोच्च विधायक असे समाजसेवक आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉक्टर्स लोकांच्या आजाराचे निराकरण करण्याबरोबरच त्यांना आणीबाणीच्या परिस्थितीत जीवनदानही देतात. तसेच राधाकृष्णन बी., आहेर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, आयएमएच्या मागील वर्षभराच्या विविध कार्याचा आढावा पलोड यांनी यावेळी घेत उपक्रमांची माहिती दिली.देवरे यांनी आगामी वर्षभरात आयएमएकडून राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या आरोग्यावर भर देत त्यांचे आरोग्य उत्तम कसे राखता येईल, यादृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. डॉ.मंजिरी मदनूरकर, डॉ. निकिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
‘आयएमए’नाशिकच्या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 2:51 PM
मावळते अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांच्याकडून नुतन अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांनी पदभार स्विकारला. तसेच उपाध्यक्षपदाचा पदभार डॉ.हेमंत सोननीस, सचिवपदी, डॉ.विशाल गुंजाळ तर खजिनदारपदी डॉ. किरण शिंदे आणि महिला आघाडीप्रमुख म्हणून डॉ. गीतांजली गोंदकर यांनी पदग्रहण केले.
ठळक मुद्देडॉक्टर्स हे सर्वोच्च विधायक असे समाजसेवक