नाशिकरोड : डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करून आपली नैतिकता पाळावी, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी केले.नाशिकरोड इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्याप्रसंगी गोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्ता मोघे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव पोटे, डॉ. विभा कोमावार, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. मनोहर जाधव, डॉ. सतीश पापरीकर, डॉ. विद्या पाटील, डॉ. शैलजा बल्लाळ, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. राजेंद्र अकुल, डॉ. अनुप कुमट, डॉ. शीतल जाधव, डॉ. सुनील पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ़ दिलीप गोडे म्हणाले की, समाजातील सर्वच स्तरातील नागरिक डॉक्टरांकडे मोठ्या आशेने बघतात़ डॉक्टरांच्या उपचाराने रुग्ण बरा व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते़ अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि संशोधनामुळे आजच्या काळात ते शक्य झाले आहे़ यावेळी डॉ. कानडे, मावळते अध्यक्ष डॉ. प्रशांत मुठाळ यांनी उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अरुण स्वादी, डॉ. अलका स्वादी यांनी केले. आभार डॉ. अनुप कुमट यांनी मानले. यावेळी डॉ. कैलास मोगल, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. अजित जगताप, डॉ. संघर्ष मोरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रशांत मुठाळ, उपाध्यक्ष डॉ. नंदिकशोर कातोरे, सचिव डॉ. अनुप कुमट, खजिनदार डॉ. राजेंद्र अकुल, सहसचिव डॉ. अजित जगताप, सहखजिनदार डॉ. रवींद्र गायकवाड, नियोजित अध्यक्ष डॉ. मयूर सरोदे, सल्लागार डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. वसंत सहस्त्रबुद्धे, डॉ. नंदकुमार भिडे, डॉ. मनमोहन हांडा, डॉ. अरुण स्वादी आदींनी पदभार स्वीकारला.
आयएमए नाशिकरोड शाखेचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:02 AM