पिंपळगाव बसवंत : शहर व परिसरातील रु ग्णाच्या मोफत सेवेसाठी अनामत तत्वावर कुठलेही भाडे न घेता फाऊलर बेड, वॉकर, कमोड चेअर, ट्राय पॉट, व्हिल चेअर, ट्रॅक्शन सेट, बॅक रेस्ट, कमोडपॉट, एअर बेड, वॉटर बेड, वॉकिंग स्टिक आदी वस्तूच्या मोफत केंद्राचे शुभारंभ पिंपळगाव बसवंत येथील उज्ज्वल गोशाळा संचालक किशोर ठक्कर यांच्या हस्ते व राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह कृष्णा घरोटे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.सर्वसामान्य रु ग्णांना आजारपणात अनेक साधनांची आवश्यकता असते आणि या साधनांचे महत्व देखील याच काळात समजते. ज्या कुटुंबावर ही वेळ येते त्यांच्यासाठी अशी साधने मिळवणे अनेकदा जिकीरीचे होऊन बसते.या वस्तू विकत घेण्याचीही अनेकांची ऐपत नसते अशा काळात काय करावे समजत नाही. चांगली आर्थिक परिस्थिती असली तरी वस्तू कायमस्वरूपी लागणार नसल्यामुळे ती विकत घेणे देखील व्यवहार्य नसते समाजाची हीच गरज ओळखून पिंपळगाव बसवंत येथे सारथी रु ग्ण उपयोगी वस्तूच्या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.रु ग्णांकडून कोणतेही भाडे न आकारता मोफत वस्तू देण्याचे काम पिंपळगाव बसवंत येथे सुरू झालेले आहे. गरजु रु ग्णांनी या मोफत साहित्यचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आरोग्य आयाम प्रमुख नरहर जोशी, शैलेश पंडित, अनिल चांदवडकर, डॉ. हर्षदा कतवारे, डॉ. सुधीर भांबर, प्रशांत मोरे, किरण डेरे, योगेश आहेर आदींकडून करण्यात आले आहे .(फोटो ०४ पिंपळगाव)मोफत रु ग्णउपयोगी साहित्य केंद्र सारथीचे शुभारंभ करतांना उज्ज्वल गोशाळा संचालक किशोर ठक्करसमवेत राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह कृष्णा घरोटे, शैलेश पंडित, अनिल चांदवडकर, डॉ. हर्षदा कतवारे व नागरिक.
रु ग्ण साहित्य मोफत केंद्राचे पिंपळगावला येथे शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 5:24 PM
पिंपळगाव बसवंत : शहर व परिसरातील रु ग्णाच्या मोफत सेवेसाठी अनामत तत्वावर कुठलेही भाडे न घेता फाऊलर बेड, वॉकर, कमोड चेअर, ट्राय पॉट, व्हिल चेअर, ट्रॅक्शन सेट, बॅक रेस्ट, कमोडपॉट, एअर बेड, वॉटर बेड, वॉकिंग स्टिक आदी वस्तूच्या मोफत केंद्राचे शुभारंभ पिंपळगाव बसवंत येथील उज्ज्वल गोशाळा संचालक किशोर ठक्कर यांच्या हस्ते व राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह कृष्णा घरोटे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
ठळक मुद्देज्या कुटुंबावर ही वेळ येते त्यांच्यासाठी अशी साधने मिळवणे अनेकदा जिकीरीचे होऊन बसते.