सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे ‘एक मूठ पोषण’ या पोषण आहार अभियान कार्यक्र माचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य हरिदास लोहकरे, सरपंच ताराबाई बांबळे, उप-सरपंच रामचंद्र परदेशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे यांचे हस्ते झाले. या वेळी, सहायक प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे मुख्य आंगनवाडी पर्यवेक्षिका पुर्वा दातरंगे, अंश्मंत दातरंगे हे उपस्थित होते. हा कार्यक्र म एक ते तीस सप्टेबंर पर्यंत सुरू राहाणार आहे.माता आण िबालकांच्या पोषणावर लक्ष केंद्रित करून कुपोषणाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी पोषण अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी अभियान प्रकल्प आहे. आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनासाठी कोरोनाच्या पाशर््वभूमिवर सर्व नियमांचे पालन करून खेड बिटाअंतर्गत टाकेद, अधरवड, टाकेद खुर्द, अडसरे बुद्रुक व खुर्द मायदरा धानोशी, बारशिंगवे, बांबळेवाडी, घोड़ेवाडी, घोरपडेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, चौराईवाडी, ठोकळवाडी ईत्यादी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्र म आयोजित केला होता. या कार्यक्र मात विविध पाक कलाकृतींचे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रान भाज्या, फळ भाज्या, हिरव्या पाले भाज्या व विविध प्रकारचे खाद्य पदार्थ शेंगदाण्याचे लाडू, नागलीचे लाडू, आळुच्या वड्या, पराठे, खुरासणी चटणी, ढोकळा, भाकरवडी, मोड आलेलं कडधान्य, तांदळाची चकली, ठेचा ईत्यादीपाक कलेचे विविध प्रकार महिलांनी तयार करून प्रदर्शनात ठेवले होते. याचा अनेकांनी आस्वाद घेतला व समाधान व्यक्त केले.असा आहे हा उपक्र म...एक मूठ पोषण अभियानांतर्गत मध्यम व तीव्र वजन गटातील बालक, मध्यम व तीव्र कुपोषित श्रेणीतील बालक, गरोदर माता यांच्यासाठी रोज पाच मिली खोबरेल तेल,गुळ, शेंगदाणे, बटाटा, एक अंडे, मोड आलेल कडधान्य, मूठभर चणे फुटाणे हे ग्रामपंचायतच्या सहभागाने मिळणार आहे.या सप्ताहांत गृहभेटीवर भर देण्यात येणार आहे. या मध्ये पोषण आहार व त्याचे महत्त्व, अ?नेमिया आजार, गरोदर व स्तनदा मातांकडे लक्ष दिले जाणार आहे.या वेळी सुंदर रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते.या वेळी रतन बांबळे, ग्रा. प. सदस्य सतिष बांबळे, विक्र म भांगे, नंदाबाई शिंदे, कविता धोंगडे, भीमाबाई धादवड, राम शिंदे, लता लहामटे, पोर्णिमा भांगे, भारती सोनवणे, अनिता गायकवाड, रिता परदेशी, सुमन धोंगडे, ज्योती भवारी, ताराबाई परदेशी, सुनिता जाधव, आशा भालेराव, मंगल डोळस, वर्षा चोथवे,सुनिता भांगे, अनिता खामकर, सिता साबळे, सकुबाई गागरे, बसवंता वारघडे आदीउपस्थित होते.
टाकेद येथे एक मूठ पोषण उपक्र माचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:24 PM
सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे ‘एक मूठ पोषण’ या पोषण आहार अभियान कार्यक्र माचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य हरिदास लोहकरे, सरपंच ताराबाई बांबळे, उप-सरपंच रामचंद्र परदेशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे यांचे हस्ते झाले.
ठळक मुद्देपाक कलेचे विविध प्रकार महिलांनी तयार करून प्रदर्शनात ठेवले