नाशिक : शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे शिक्षकांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले. कृतिशील शिक्षक वंचितांच्या शिक्षणासाठी काम करीत असताना मुक्त विद्यापीठाकडून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी वायुनंदन यांनी दिले.राज्यातील कृतिशील शिक्षक महाराष्ट्र समितीतर्फे मुक्त विद्यापीठाच्या प्रागंणात दोन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण संमेलनाचे शुक्रवारी (दि.२४) कुलगूरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. ज्येष्ठ व्याख्याता डॉ. कविता साळुंके, ज्योती बेलवले यांनी मनोगत व्यक्तकेले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी सीसीआरटी नवी दिल्लीचे समुपदेशक डॉ. हितेश पानेरी यांनी समुपदेशन सत्रातून मार्गदर्शन केले. संदीप पवार, लहू बोराटे, सचिन सूर्यवंशी, किरण गायकवाड, संदीप शेजवळ यांनी ‘उपक्रमशील शाळा’ या विषयावर प्रकाशझोत टाकला. विशेष शिक्षक सुरेश धारराव, सोपान खैरणार, राहुल भोसले यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास सादर केला. सायंकाळी कवी कट्टामध्ये शिक्षक कवींनी विविध विषयांवरील त्यांच्या कविता सादर केल्या. सहसमन्वयक ज्ञानदेव नवसारे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश चव्हाण व विलास गवळे यांनी सूत्रसंचालन केले.
कृतिशील शिक्षक संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:24 AM