सिन्नर : येथील संजीवनी नगरमधील महादेव कॉलनीत कामगार शक्ती फाऊंडेशन संचलित कामगार शक्ती सहकारी ग्राहक भांडारचे उद्घाटन करण्यात आले. कामगार शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अॅडव्हान्स एन्झाईम कारखान्याचे संचालक किशोर राठी व ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते ग्राहक भांडारचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कामगार शक्ती फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बी. एन. नाकोड, माजी सैनिक सुरेंद्रपाल धांड, मारुती दिघोळे, बाबूलाल शेलार, हाडवैद्य विठ्ठल वाघ, सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गिते, हौशी मूर्तीकार संजय क्षत्रिय यांचा सत्कार करण्यात आला. सिन्नरच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सहकारातून समृध्दीकडे नेण्याची संकल्पना प्रत्यक्षात राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजक राठी यांनी यावेळी केले. सहकाराचा कारभार योग्य रितीने केल्यास त्याची वृध्दी होण्यास वेळ लागत नाही, त्यासाठी संयमाची गरज असल्याचे मत संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक विलास कवडे यांनी व्यक्त केले. कामगारांच्याच भांडवलातून ग्राहक भांडार उभारण्यात आल्याचे कामगार शक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरवार यांनी सांगितले. रवींद्र गिरी यांनी आभार मानले. याप्रसंगी कामगार शक्ती फाऊंडेशनचे नवनाथ सोबले, नितीन नाईकवाडी, किरण भोसले, कोमल धांड, पांडू वैद्य, बाबूराव धुळे, बाळासाहेब घोटेकर, संतोष नवले, किरण आहेर, मगन साळवे, विश्वजित निकम, माणिक नवले, सुरेश जोंधळे, गृहउद्योगाच्या सुषमा नाईकवाडी, प्रमिला सरवार, स्वाती गिरी, जयश्री भोसले, सुनीता सोबले, स्मिता कदम, दिपाली चिंतामणी, आरती जोंधळे, शैला पानगव्हाणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कामगार शक्ती ग्राहक भांडारचे उद्घाटन
By admin | Published: October 26, 2016 11:18 PM