मालेगाव येथील मराठा दरबार सभागृहात उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटना प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन राऊत बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, अॅड. आर. के. बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत हगवणे, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे आदि उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, अपघातात जखमी होणाऱ्या वाहनचालकाचे परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. घरातील कर्तापुरुष गेल्याने कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. चारचाकी वाहन चालक मोठ्या आवाजात गाणे ऐकत वाहने चालवितात. त्यामुळे त्यांचे वाहनावर नियंत्रण राहत नाही. पोलीसांनी हेल्मेट सक्तीची कठोरपणे अमलबजावणी करावी त्यामुळे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल. शहरात आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल बसविण्यात येणार असून यासाठी पोलीस दलासह संबंधितांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत हगवणे, प्राचार्य सुभाष निकम व अॅड. आर. के. बच्छाव यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक किरण बिडकर यांनी केले. सूत्रसंचलन विकेश अहिरे यांनी तर आभार तुषार मिस्तरी यांनी मानले.
मालेगावी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 5:24 PM