नांदगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार सुहास कांदे यांचे हस्ते करण्यात आले. मका आवक कमी झालेली असतांना सुद्धा बाजारभावात कमालीची घसरण झालेली आहे. कोरोना व्हायरस मुळे पोल्ट्री उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने उत्पादक शेतकरी मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत वारंवार मागणी करत होते.पिकांची विविधता बघता येथे अन्न प्रक्रि या उद्योग आणता येतील तसेच शासनाच्या योजनेतून नवीन गुदामाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करून असे आश्वासन कांदे यांनी यावेळी दिले. तहसिलदार उदय कुलकर्णी, बाजार समतिीचे सभापती तेज कवडे व विलास आहेर, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, सहाय्यक निबंधक देवरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, बाजार समितीचे संचालक एकनाथ सदगीर आदी उपस्थित होते.
नांदगावी मका खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:30 PM