मनमाड : येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन पानेवाडी येथे व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर उपस्थित होते.विजय सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे तरुणांना कार्यप्रवण करण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. डॉ. बी. एस. जगदाळे यांनी महाविद्यालयाची सामाजिक पार्श्वभूमी समजून सांगितली. या दिवसीय शिबिरात, सक्षम युवा समर्थ भारत व एक भारत श्रेष्ठ भारत हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, प्रा. एन. ए. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली १२५ स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
मनमाडला रासेयो शिबिराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:00 AM