मालेगाव : गेल्या वर्षभरात रोटरी ग्रामीण भागात पोहचवली. वर्षभरात शेतीसाठी नवीन प्रकल्प राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे प्रतिपादन मिडटाऊनचे नुतन अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी केले. मिडटाऊन पदग्रहण कार्यक्रमात देवरे बोलत होते.या वेळी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपप्रांतपाल अॅडव्होकेट उदय कुलकर्णी, मावळते अध्यक्ष संदीप पवार, सचिव केशव खैरनार, रोटरॅक्ट लुमसिटीचे अध्यक्ष भावेश अमृते, सचिव हर्षल पाचपुते उपस्थित होते. देवरे यांनी कोरोना बाबत आरोग्य जागृतीसह जलसंधारण व शेतकरी मार्गदर्शन शिबिरे आयोजनात भर देणार असे सांगितले.यावेळी बोलताना भामरे यांनी मालेगाव रोटरीने आंतरराष्ट्रीय रोटरीत वेगळा ठसा उमटविला असल्याचे गौरवोद्गार काढले. अॅड. कुलकर्णी यांनी गवर्नरांचा संदेश देत वर्षभर रोटरीचे काम वाढवण्याचे आवाहन केले. पवार यांनी कारकिर्दीचा आढावा घेतला.नव्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. नवीन सदस्य महेंद्र वारुळे,सुभाष दशपुते यांना पिन प्रदान केली. उदय राहुडे व सचिन शहा यांनी सुत्रसंचालन केले. खैरनार यांनी नुतन रोटरी पदाधिकारी यावेळी घोषित केले. दरम्यान इनरव्हिल मिडटाऊनच्या अध्यक्षा संगिता सोनजे यांनी घरगुती पदग्रहण स्विकारले. मावळत्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी पदभार सोपवला.या वेळी सचिव हिराताई अहिरे उपस्थित होत्या.
रोटरी क्लब मिडटाऊनचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 8:18 PM