नाशिक : समग्र समाजात स्नेह आणि बंधुभाव वृद्धिंगत होऊन सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘रंगसंगीती’ कला समूहाच्या ‘शांतिदूत बुद्ध’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि.२) शहीद निनाद मांडवगणे यांच्या मातोश्री सुषमा मांडवगणे यांच्या हस्ते झाले.कुसुमाग्रज स्मारक येथे बुधवार (दि.५) पर्यंत हे प्रदर्शन सुरू असून, यातील विविध चित्रकला आणि शिल्पकला पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी महेंद्र गायकवाड यांच्यासह विश्वास ठाकूर, भारत तेजाळे, प्रकाश दोंदे आदी उपस्थित होते. या कलाप्रदर्शनातून शिल्पकार सारग शिरसाठ व रमाकांत गायकवाड यांच्यासह शिल्पकार अशोक धिवरे, अतुल भालेराव, अरुण जाधव, विशाल तेजाळे, विद्या जाधव, कोमल वाघमारे, सचिन पगारे, पवन चंद्रमोरे, संजय ढगे, सोनाली साळवे, देवेंद्र उबाळे, वैशाली पखाले, प्रियांका चंद्रमोरे, सुनील उन्हवणे, पल्लवी निकम यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन देवेंद्र उबाळे यांनी केले, तर अशोक धिवरे यांनी आभार मानले.
‘शांतिदूत बुद्ध’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:33 PM