वडनेरभैरव : येथील मविप्र संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते व पंचायत समिती सभापती अमोल भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले.या उद्घाटन सोहळ्याला मविप्रचे शिक्षण अधिकारी नानासाहेब पाटील, शोभा कडाळे, कविता धाकराव, नितीन आहेर, शिवाजी सोनवणे, महेश पाटील, सरपंच शांताबाई बेंडके, हिरामण शिंदे, राजाभाऊ भालेराव, श्रीधर देवरे, विस्तार अधिकारी एस.एस. कांबळे, आर.एन. पाटील, विनायक पाटील, डी.आर. बारगळ, संयोजक प्राचार्य ए.एल. भगत व्यासपीठावर उपस्थित होते.कुंभार्डे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देणे गरजेचे आहे. त्यासाठी वैज्ञानिक संस्कार करावे लागतील.महाविद्यालयाचे प्राचार्य ए.एल. भगत यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षण विस्तार अधिकारी आर.एन. निकम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र माला प्रा. एन. डी. वडघुले, प्रा. विठ्ठलराव जाधव, प्रा. एम. एम. भोसले, प्रा. भीमराज गायकवाड, प्रा.जयश्री शिंदे, प्रा. श्रीमती राणी पाटील, प्रा. प्रमोद निकम आदी उपस्थित होते. या प्रसंगी दत्तात्र्येय माळी, डी.एल. आबा पाचोरकर, एस.आर. पवार सर, भाऊसाहेब भालेराव, विजय भालेराव, पोपटराव पाचोरकर, डॉ. विक्र म सलादे, जिभाऊ शिंदे, मा. बापूराव सोनवणे, सनराईजच्या प्राचार्य नायडू मॅडम, मुख्याध्यापक के.आर. सोनवणे आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विविध शाळा विद्यालयांतून सहभागी शिक्षक उपस्थित होते. प्रा. ज्ञानेश्वर भगुरे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. दिलीप पाटील यांनी आभार मानले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये चांदवड तालुक्यातील २७१ शाळा सहभागी झाल्या असून, ३१४ संशोधन मॉडेल विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन असून, त्याचा परिसरातील विज्ञानप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.४सोहळ्याचे अध्यक्ष सभापती अमोल भालेराव यांनी वडनेर गावाला संशोधनाची परंपरा असून, या गावचे भूमिपुत्र जयवंत भालेराव हे अहमदाबाद येथे शास्रज्ञ म्हणून कार्यरत असून, अशा विज्ञान प्रदर्शनांतूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगितले.
वडनेरभैरवला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:18 PM