ठळक मुद्देयावेळी विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सिड रेन, टाकाऊपासून टिकाऊ, संसाधन व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक रिसायकलिंग प्लॅन, कूलर, पावसाच्या पाण्याचे जलशुद्धीकरण, आरोग्य स्वच्छता, पाणी बचत, गणिताची गंमत जंमत, विद्युतनिर्मिती, वॉटरमोटार, वाहन सिग्न
निफाड : तालुक्यातील उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन साहेबराव पानगव्हाणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य के.ए. गवळी, पर्यवेक्षक एस.एस. शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी परीक्षक म्हणून नरेश चौरे, शीतल ढोमसे यांनी कामकाज बघितले. या विज्ञान मेळाव्यातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : मेळाव्यातील लहान गट (पाचवी ते आठवी) प्रथम- शिवम जेऊघाले (उपकरण- सिड रेन), द्वितीय- इकरा तांबोळी (उपकरण- टाकाऊपासून टिकाऊ), मोठा गट- (नववी व दहावी) प्रथम- सुजित पानगव्हाणे (उपकरण- संसाधन व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन), द्वितीय- तेजश्री शिंदे, (उपकरण- प्लॅस्टिक रिसायकलिंग प्लांट).