उमराणे : १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा व्हावा यासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन येथील छत्रपती शिवाजी राजे चौकात झाले. प्रथमत: रामेश्वर महादेव मंदिरात श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर शिवाजी राजे स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात आली. तारखेप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा व्हावा या हेतूने ग्रामीण शिवजयंती उत्सव समिती देवळा तालुक्याच्या वतीने व जाणता राजा मित्रमंडळाच्या संकल्पनेतून संपूर्ण देवळा तालुक्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या प्रसारासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समिती सभापती राजेंद्र देवरे, माजी सरपंच रामदास देवरे, सुदाम देवरे, दिलीप देवरे, बाळासाहेब देवरे, भाऊसाहेब देवरे, दत्तू देवरे, सुभाष देवरे, मोतीराम देवरे, बापू देवरे, वामन तुळशीराम देवरे, निवृत्ती देवरे, मुरलीधर देवरे, सचिन देवरे हे होते. देवळा तालुका सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती यावेळी उपस्थितांना दिली. कार्यक्र माचे अध्यक्ष प्रशांत देवरे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. ात जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवासाठी देवळा तालुक्यात जन जागृती व्हावी या हेतूने जाणता राजा रथाचे आयोजन करून राज्यात एक नवीन आदर्श घालून दिल्याचे कौतुक केले. उपक्र म यशस्वी करण्यासाठी हेमंत देवरे, किरण सोनार, चिंतामण देवरे, उमेश देवरे, बाळा पवार, दत्ता जाधव, रामराव देवरे, संदीप देवरे, प्रदीप देवरे, वालचंद देवरे, तात्या देवरे, संपत देवरे, शिवराजे देवरे, विशाल देवरे, शरद जाधव, अविनाश देवरे, सतीष देवरे, राहुल देवरे, खंडू देवरे, देविदास देवरे, संपत देवरे, आबा देवरे, सुनील देवरे, रु पेश जाधव, जयवंत आहिरे, पंकज देवरे, शशिकांत देवरे यांनी कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शिवजयंती उत्सव जाणता राजा जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:07 AM
उमराणे : १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा व्हावा यासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन येथील छत्रपती शिवाजी राजे चौकात झाले.
ठळक मुद्देमहादेव मंदिरात श्रीफळउपक्रमाची सविस्तर माहिती