ओझरटाउनशिप : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे शालेय क्र ीडामहोत्सव व ग्रंथ सप्ताहाचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी पालक - शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रदीप आहिरे, दीपक श्रीखंडे, बाळासाहेब फुलदेवरे, रमेश खैरनार, दिलीप चापळकर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय परिसरात ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या पोशाखाने मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले तसेच शालेय ग्रंथालयात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी प्रदीप आहिरे यांनी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. बाळासाहेब फुलदेवरे यांनी वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी खेळाबरोबर वाचनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.यावेळी उमेद कुलकर्णी, विजय हिरे, किशोर कचवे, गीता दामले, भारती भोज, संगीताच्या वळवी, रमेश बंदरे, रवि जाधव, योगेश बंदरे, मधुकर हिरे यांच्यासह शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव यांनी केले. अतिथी परिचय शाळेचे क्र ीडाशिक्षक उल्हास कुलकर्णी यांनी, तर आभार शाळेचे ग्रंथपाल अर्चना देवरे यांनी मानले.
ओझर येथे क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:14 PM