येवला : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.येवला तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज धानोरे आणि विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४५ वे विज्ञान प्रदर्शनाचे कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल येथे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार दराडे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कंचनसुधा ट्रस्टचे अध्यक्ष अजय जैन, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी, पंचायत समितीच्या सभापती कविता आठशेरे, रवींद्र जैन, अक्षय जैन, डॉ. स्वप्नील शहा, प्राचार्य दत्ता महाले, संतोष विंचू, प्राचार्य माणिक मढवई, डॉ. दर्शना जैन, राणी भंडारी, पी. डी. गायकवाड, रमेश गायकवाड, सुनील मारवाडी, रामदास भवर, माणिकराव मढवई, रामदास भड, बाजीराव सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.अदिती पटेल, प्रियंका पटेल आणि समूहाने स्वागत गीत सादर केले. गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे यांनी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. अतिथी परिचय सुनील मेहत्रे यांनी करून दिला. यावेळी प्रवीण गायकवाड, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात प्राथमिक विभागात ९१, माध्यमिक विभागात ६८, शिक्षक शैक्षणिक साहित्य गटाच्या प्राथमिक विभागातून ११, माध्यमिक विभागातून ४ तर प्रयोगशाळा परिचर गटातून ४ उपकरणे मांडण्यात आली आहेत.प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दिवसभर रांगा लागल्या. किरण नागरे, नीलेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी आभार मानले.
तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:12 AM