फौंडेशनने गेल्या चार वर्षांत सोनांबे शिवारातील आई भवानी मंदिर परिसरात व डोंगरावर सुमारे साडेतीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, प्रथमोपचार पेट्या वाटप, वन्यप्राण्यांसाठी पाणवठा आदी उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांचा आलेख संस्थेचे स्वयंसेवक डॉ. महावीर खिवंसरा यांनी उपस्थित सदस्यांसमोर मांडला. अनिल जाधव यांनी आभार मानले. यावेळी या वर्षात दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. यावेळी सचिन आडणे, राजेंद्र जाधव, गुरुदास पाटोळे, संदीप आहेर, अतुल मिसाळ, सचिन कासार, शेलार मामा, पृथ्वी बोडके, चिन्मय विशे, कुणाल बोडके आदी उपस्थित होते.
फोटो - ०१वनप्रस्थ वेबसाईट
वनप्रस्थ फौंडेशनच्या स्थापनेला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संकेतस्थळाचे उद्घाटन करताना पदाधिकारी.
===Photopath===
010221\01nsk_17_01022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०१वनप्रस्थ वेबसाईट वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्थापनेला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संकेतस्थळाचे उद्घाटन करताना पदाधिकारी.