नाशिक : महाराष्ट राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय महाखादी प्रदर्शनाचे उद््घाटन मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या हस्ते झाले. खादीला नवचैतन्य आणण्याचा मुख्य उद्देश या प्रदर्शनामागे असून, यात सुतकताईची प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार आहे. हुतात्मा स्मारक येथे आयोजिलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चोरडिया यांनी सांगितले की, ग्राहक व उत्पादकांचा संवाद घडून यावा, ग्राहकांच्या अपेक्षा उत्पादकांना कळाव्यात या उद्देशाने या महाखादी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्टÑात विखुरलेले बारा बलुतेदार या ब्रॅँडच्या खाली एकत्र येऊन स्वत:चा व पर्यायाने देशाचा विकास करू शकतील. महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांमध्ये सलग २० दिवस ही यात्रा चालणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर, आमदार सीमा हिरे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, पद्माकर पाटील, पी. पी. देशमुख, सीताराम दळवी, बी. पी. भारती, आनंद कर्णिक, रमेश सुरुंग आदी मान्यवर उपस्थित होते. सोमवारपर्यंत (दि.१३) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत हे प्रदर्शन चालणार आहे. ‘महाखादी नंबर वन’ होणार महाराष्टचा महाब्रॅँडखादी ग्रामोद्योग मंडळाकडून चर्मोद्योग, बांबूंच्या वस्तू, खाद्यपदार्थ, नीरा, मातीकला, आदिवासी वस्तू, खादीची वस्त्रे, वनउत्पादने, मध आदींचे नव्याने सादरीकरण करीत त्यांना महाराष्टÑाची खास ओळख म्हणून लोकांसमोर आणण्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत. यातच ‘महाखादी नंबर १’ हा ब्रॅँड म्हणून लोकांसमोर येणार असल्याचेही चोरडिया यांनी सांगितले.
महाखादी प्रदर्शनाचे दिमाखात उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:45 AM
महाराष्ट राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय महाखादी प्रदर्शनाचे उद््घाटन मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या हस्ते झाले. खादीला नवचैतन्य आणण्याचा मुख्य उद्देश या प्रदर्शनामागे असून, यात सुतकताईची प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार आहे.
ठळक मुद्देतीन दिवसीय महाखादी प्रदर्शनाचे उद््घाटनविखुरलेले बारा बलुतेदार या ब्रॅँडच्या खाली एकत्रसलग २० दिवस यात्रा चालणार