ठळक मुद्दे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही संकल्पना
चांदवड : तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीस १४व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन ह.भ.प. रमेश दत्तू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कळमदरेचे नूतन सरपंच डॉ. बाळासाहेब वानखेडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमदरे गावात चांगली सुविधा व्हावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.यावेळी सुखदेव रामचंद्र जाधव, कैलास कारभारी बच्छाव, कुसुमबाई विठोबा गांगुर्डे, गंगूबाई शिवराम वानखेडे, सागर काशीनाथ जाधव व कळमदरे येथील नागरिकांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचेदेखील पालन करून कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.