पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभावात सुधारणा झालेली आहे. रविवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक ६० टक्केपर्यंत आली होती. लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ३६ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.हिवाळा सुरू झाल्याने व त्यातच काही ठिकाणच्या भागात शेतमालाला पाणी कमी पडत असल्याने कोथिंबीर मालाची आवक घटत चालल्याने गेल्या आठवड्याभरापासून कोथिंबीर बाजारभावात तेजी निर्माण होत चालल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. शनिवार पाठोपाठ रविवारच्या दिवशीही कोथिंबीर ३६ रुपये शेकडा दराने विक्री झाली. दरात वाढ होणारआगामी कालावधित शेतमालाला लागणारे पाणी कमी पडले, तर बाजारभाव काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.कोथिंबीर पाठोपाठ किरकोळ बाजारात मेथी २०, कांदापात १५ रुपये, शेपू १० व पालक ५ रुपये प्रति जुडी दराने विक्री होत आहे.
आवक घटली; कोथिंबीर तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 1:04 AM
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभावात सुधारणा झालेली आहे. रविवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक ६० टक्केपर्यंत आली होती. लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ३६ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
ठळक मुद्देनाशिक बाजार समिती : शेतकऱ्यांमध्ये समाधान