अस्ताणे : मालेगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चाळीसगाव चौफुलीवर मोठ्या प्रमाणात चोºया वाढल्या असून, संबंधितांनी मोकाट चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.चाळीसगाव चौफुलीहून जवळ असणाºया गावातील ग्रामस्थ रात्री पहाटे बाहेरगावहून येत असतात. रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेले चोरटे एकांतात जबरी चोरी करून लुटतात. प्रसंगी बेदम मारहाण करतात. असे प्रकार वारंवार होऊनही पोलीस त्याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थात संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी रात्री शालिवान देवरे नामक युवकास चोरट्याने बेदम मारहाण करून त्यास लुटल्याची घटना घडली.सदर तरुणाचे पैसे आणि कपडे चोरट्याने मारहाण करून हिसकावून नेले, शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शालिवान हा नाशिकहून चाळीसगाव फाट्यावर उतरला. त्याला अस्ताणे येथे जायचे होते, म्हणून त्याने सायकल मागवून ठेवली होती. अस्ताणे येथे येण्यासाठी चाळीसगाव फाट्यावर रात्री गाड्या थांबत नसल्याने आपल्या जवळील सायकलनेच घराकडे जाण्यास निघाला.रात्री चाळीगाव फाट्यावर चोरांनी त्याच्या गळ्यावर चाकू ठेवत मारहाण करीत पैसे व बॅग चोरून नेली. असे प्रकार नेहमीच होत असतात; परंतु पोलिसात तक्रार कुणी करत नाही. पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा.
चाळीसगाव फाट्यावर चोरीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 9:05 PM
अस्ताणे : मालेगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चाळीसगाव चौफुलीवर मोठ्या प्रमाणात चोºया वाढल्या असून, संबंधितांनी मोकाट चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी ...
ठळक मुद्देबंदोबस्ताची मागणी। वाटसरुंना होते मारहाण