नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार शेतकºयांना योजनेचा लाभ होणार आहे. योजनेतील दुसरी यादी २८ तारखेला जाहीर केली जाणार आहे.दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांचे कर्जमाफ करण्याच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून राज्याची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे आणि निफाड तालुक्यातील चांदोरी गावांमधील शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ पहिल्या टप्प्यात दिला जाणार आहे.या दोन्ही गावांतील शेतकºयांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरणाचे काम आपले सरकार केंद्रांवर व संबंधित बॅँकांच्या शाखेत करण्यात येत आहे. ज्यांचे प्रमाणीकरण झाले आहे त्यांना प्रमाणपत्रदेखील दिले जात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमुक्ती योजनेची दोन लाखांची रक्कम जमा होणार आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १०७ लाभार्थ्यांपैकी सुमारे सात हजार बॅँक कर्जदारांची खाती आधारलिंक नसल्याने त्यांचे खाते आधारलिंक करण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. महसूल यंत्रणेवर आधारलिंक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी गावागावात जाऊन कर्जखाते आधाराशी लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. शेतकºयांच्या घरी जाऊन त्यांचे खाते आधारलिंक करवून घेतले. सद्यस्थितीत जिल्हा बँकेचे ६८, तर अन्य बँकांचे ३३० कर्ज खातेदारांचे अजूनही आधारलिंक झालेली नाहीत. चांदोरीतील ५२० शेतकºयांची नावे पहिल्या यादीत आली आहेत. त्यातील २१२ शेतकºयांचे, तर सोनांबे गावातील २५८ लाभार्थ्यांपैकी १५१ कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे.
कर्जमुक्ती योजना ही बॅँकांचा एनपीए करण्यासाठीची योजना नाही तर शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठीची आहे. कर्जमुक्तीच्या लाभानंतर कर्जदार म्हणून बॅँका शेतकºयांची नवीन कर्जासाठी अडवणूक करणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. कर्जमुक्तीनंतर शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र होतील.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी