शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

मालेगाव आगाराचे बुडाले आठ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:34 PM

मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका । मागणीनुसार मालवाहतूक बसेस सुरू

मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.राज्यात कोरोनाने कहर केला आहे. प्रारंभी मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. परिणामी मालेगावहून बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरून मालेगावी येणाºया सर्वच एसटी बसेसला गेल्या २२ मार्चपासून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ती आजतागायत तशीच आहे. परिणामी मालेगाव आगाराचे प्रतिदिन ७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. महिन्याकाठी दोन कोटी २१ लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत मालेगाव आगाराच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. लॉकडाऊन काळात आगाराला आठ कोटी ८४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याने आगाराची स्थिती खालावली आहे. मालेगाव आगारात एकूण ४५० कर्मचारी कार्यरत आहेत. यात एक आगारप्रमुख, दोन बसस्थानक प्रमुख, १८० चालक, १७० वाहक, ७ मेकॅनिक यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपासून ७५ बसेस आगारात उभ्या आहेत. ग्रामीण भागाची जनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया बसेस सध्या धूळ खात आहेत. जिल्ह्यातील काही भागातील मार्गांवर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्टÑ, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मालेगाव आगारात बससेवा सुरू न झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या केवळ मागणी असेल त्याप्रमाणे मालवाहतूक बसेस सुरू आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे आगाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे शक्य नसल्याने आर्थिक अडचण निर्माण होणार आहे. आदेश आल्या नंतरच बससेवा पूर्ववत सुरू करू.- के. बी. धनवटे,आगारप्रमुख, मालेगाव

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ