---
पंचनामे करण्याची मागणी
नाशिक : जिल्ह्यात पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. शेतीच्या कामांमध्येही अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
---
शहर बससेवा सुरू करण्याची मागणी
नाशिक : शहर वाहतूक बससेवा अद्याप सुरू न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर वाहतूक बससेवा बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहनांचे दर अनेकांना परवडणारे नाहीत. यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
रिक्षाचालकांना आर्थिक अडचणी
नाशिक : पेट्रोलची झालेली दरवाढ, कोरोनामुळे प्रवासी बसवण्यावर असलेले निर्बंध यामुळे अनेक रिक्षाचालकांना दिवसभर रिक्षा चालवूनही पूर्ण रोजगार मिळत नाही. यामुळे अनेक रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकजण पर्यायी रोजगाराच्या शोधात आहेत.
स्कूलबस चालक अडचणीत
नाशिक : मागील वर्षीपासून स्कूल बस बंद असल्यामुळे अनेक चालकांना घरी बसून राहावे लागले आहे. काही शाळा त्यांना थोडाफार पगार देतात. पण ज्या संस्था काही देत नाहीत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण पर्यायी नोकरी करू लागले असल्याचे दिसते.