ठळक मुद्देइतर द्राक्षांच्या फुगवणीसाठी महागडे औषध अत्यावशक असताना या द्राक्षांसाठी त्याची आवश्यकता नसल्याने शेतकºयांचा मोठा खर्च वाचत असल्याचे भामरे यांचे म्हणणे आहे. गडद लाल रंगातील ही द्राक्षे खाण्यासाठी गोड व रु चकर असल्याने विदेशात यास मोठी मागणी आहे.
त्यांचीही कामगिरी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे असून, ‘कोशिश करणे वालोंकी हार नही होती’ हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांची तीन एकरवरील बहरलेली द्राक्ष बाग सध्या चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरली आहे. या बागेस जिल्हाभरातील शेतकरी भेट देत असून, त्यांच्या बागेचे व कामाचे कौतुक होत आहे.तांदूळवाडी या छोट्याशा गावात सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्राने क्रि मसन सीडलेस हे नवीन वाण असलेले द्राक्ष लावून ही किमया साध्य केली आहे. क्रि मसन सीडलेस ही व्हरायटी बागलाण तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. कुज, गळ व क्रॅकिंग व अन्य रोगांना हे वाण सहसा बळी पडत नसल्याने व याचा उत्पादन खर्च ही एकरी एक ते सव्वा लाख इतका कमी आहे.