लासलगाव(जि. नाशिक) येथील नऊ कांदा व्यावसायिकांच्या आस्थापनांवर तसेच कांदा खळ्यांवर तपासणी करण्यासाठीआयकर विभागाची पथके आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.कांदा भावात वाढ झाल्याने आयकर विभागाचे वतीने बुधवारी लासलगाव येथील कांदा व्यावसायिकांच्या दप्तरांची तपासणी सुरू झाली आहे. आयकर विभागातर्फे प्रत्येक व्यापाºयाच्या आस्थापनांवर तीन ते चार अधिकारी यांचे तपासणी पथक असून ते व्यापाऱ्यांमार्फत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आलेल्या कांदा खरेदीची माहिती संकलित करीतअसल्याचे समजते. पत्रकारांना या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लासलगाव येथील कांदा व्यावसायिकांकडेच तपासणी होत असून जिल्ह्यातील अन्य ठिकाणांच्या कांदा व्यावसायिकांकडे तपासणी झालेली नसल्याची माहिती हाती आली आहे.देशातील मागणी वाढली असून पावसामुळे दक्षिणात्य राज्यातील कांदा उत्पादन घटले आहे. परिणामी कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे भावही तेजीत आहेत. या पार्श्वभूमीवर ही तपासणी केली गेली. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
फोटो (१४ लासलगाव) लासलगाव येथे कांदा व्यापाºयांच्या आस्थापनेबाहेर उभे असलेले आयकर विभागाचे वाहन