वीरगाव : अपुºया शिक्षकसंख्येमुळे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. १५) कुलूप ठोकले. या केंद्र शाळेत पूर्ण शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.राज्य महामार्गावरील वीरगाव येथील केंद्र शाळेत गावातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात परिसरातील १७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या नियमानुसार ५२ विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असा नियम असताना या शाळेत १७८ विद्यार्थ्यांना फक्त तीन शिक्षक शिकवत आहेत. तसेच एक कायमस्वरूपी मुख्याध्यापक गरजेचा असताना प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी या शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. येथे कायमस्वरूपी पुरुष मुख्याध्यापक नियुक्त करावा, अशी मागणीही यावेळी गावकºयांनी केली. यावेळी प्रभाकर देवरे, उद्धव गांगुर्डे, महादू गांगुर्डे, किशोर देवरे, सरला देवरे, सोनुबाई सोनवणे, संगीता सोनवणे, किशोर गहिवड, सोमनाथ जाधव, दीपक गांगुर्डे यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
वीरगावच्या शाळेला ठोकले कुलूप गैरसोय : प्रभारी मुख्याध्यापक नेमल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:33 AM