चांदवड : तालुक्यातील वडबारे परिसर मोबाईल नेटवर्कपासून वंचित राहिल्याची तक्रार चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वडबारे येथील तरुणांनी निवेदनाद्वारे केली. वडबारे येथे कोणत्याच कंपनीचे मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे आज गावात कुठलीही आपत्तीसारखी घटना घडल्यास सर्वच यंत्रणांना कसे पाचारण करावयाचे, असे निवेदनात म्हटले आहे. गावात ऑनलाईन सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना इतर सुविधांपासून वंचित राहावे लागते. तसेच सध्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या आजाराने थैमान घातले असून, त्यामध्ये सर्वत्र शाळा, कॉलेजदेखील बंद आहेत. त्यामुळे शासनाने ऑनलाईन अभ्यास दिला. तो अभ्यासदेखील गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन चांदवड तहसीलदार यांनी व दूरध्वनी कार्यालयाने मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर संकेत जाधव, सचिन जाधव, अविनाश जगताप, महेश जाधव, बाळकृष्ण जाधव, नामदेव थोरात, नवनाथ जाधव ,समाधान जाधव आदींच्या सह्या आहेत.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक 30 एम.एम.जी.4-
चांदवड तालुक्यातील वडबारे येथे मोबाईल नेटवर्क नसल्याचे निवेदन देतांना युवक संकेत जाधव, सचिन जाधव, अविनाश जगताप, महेश जाधव, बाळकृष्ण जाधव.
300721\30nsk_5_30072021_13.jpg
३० एमएमजी ४