नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघात वाढल्याने या मार्गावर गतिरोधक व सांकेतिक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अर्चना जाधव यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंबंधी महापालिकेच्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले की, संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर नेहमीच लहान- मोठे अपघात होत असतात. याला कारण या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या चौकाजवळ शाळा, महाविद्यालय व दवाखाने असल्याने रहदारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या शुक्रवारी रात्रीच्या वेळी या रस्त्यावर समारासमोर धडक होऊन एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला.या रस्त्याच्या दुतर्फा कॉलनी वसाहती असून, बºयाच ठिकाणी रस्त्यालगत आणि रस्त्यावरच बांधकामाचे साहित्य पडलेले असते. त्यामुळे समोरासमोरून वाहने वेगात आल्याने वाळू, रेतीवरून वाहने घसरून पडतात. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक उभारावेत तसेच सांकेतिक फलक लावावेत. याबाबत तातडीने दखल घेऊन करवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अर्चना जाधव, अॅड. सुषमा पाटील, योगीता सासे, पद्मिनी वारे आदींसह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.
चार्वाक चौक, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघातांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:15 AM