पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले असून, गुरुवारी (दि.१२) कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी लिलावात मेथीच्या प्रति जुडीला पाच रुपये इतका वर्षातील सर्वांत कमी बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथी दर घसरले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मेथी जुडीला साधारणपणे २० ते २५ रुपये बाजारभाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मेथी भाजीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने दर घसरले आहे. सध्या हवामान स्वच्छ असल्याने सर्व शेतमालाचे उत्पादन वाढत चालले आहे. पालेभाज्या आवक वाढल्याने बाजारभाव घसरल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.पालेभाज्यांचे दरही झाले कमीनाशिक : रोजच्या जेवणात लागणाºया पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, एकीकडे मेथी जुडीला कमीत कमी पाच रुपये असा बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे किरकोळ विक्रीत मेथी जुडीसाठी ग्राहकांना किमान १५ ते २० रुपये मोजावे लागत आहे. बाजार समितीत मेथी पाठोपाठ कोथिंबीर मालाचीदेखील आवक वाढत चालल्याने बाजारभाव घसरले आहे. कोथिंबीर जुडीला कमीत कमी २५ रुपये दर मिळत आहे.
आवक वाढल्याने मेथी पाच रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:54 AM