दिरानगर : येथील वाढत्या घरफोडी व गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़ बंद घर दिसले की त्या ठिकाणी घरफोडी झालीच म्हणून समजा, अशी सद्यस्थिती आहे़ या वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत़इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी घरफोडीचे सत्रच सुरू केले आहे़ गत आठवड्यात चोरट्यांनी घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला असून यामध्ये दिवसा घरफोडीचे प्रमाण अधिक आहे़ चार दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरातील कामानिमित्त बाहेर गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा १ लाख २२ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे चोरट्यांनी चोरून नेले़ ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी दुकानाचे शटर वाकवून २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली़ दोन दिवसांपूर्वी रात्री दीड वाजेच्या सुमारास कामावरून घरी परत असलेल्या एका कामगाराला पेठेनगर कॉर्नरला तीन चोरट्यांकडून मारहाण करीत त्यांच्याकडून १० हजाराचा मोबाइल बळजबरीने हिसकावून घेतला़ यानंतर रोकड हिसकवण्याचा प्रयत्न केला असता आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले व चोरट्यांनी पळ काढला़ अशा एक ना अनेक गुन्हेगारी घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे़ त्यातच गुन्ह्यांची उकल होत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
इंदिरानगर परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:59 AM