केळझर : चौंधाणेत कृती समितीच्या बैठकीत मागणीमुंजवाड : बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथे केदा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली केळझर कृती समितीच्या ३८ गावांची बैठक संपन्न झाली. यावेळी केळझर धरणाचे मुख्य प्रवर्तक कै. गोपाळराव मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आॅक्टोबर २०१५ रोजी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी कृती समितीचे सचिव कैलास बोरसे व अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच याविरोधात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला. ही बातमी अडतीस गावातील नागरिकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने पोलीस निरीक्षकांनी दिलगिरी व्यक्त केली होती.यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजी सोनवणे, उपाध्यक्ष कडू सावकार, सचिव कैलास बोरसे, किकवारीचे सरपंच केदा काकुळते, चौंधाणेचे सरपंच राकेश मोरे, विठ्ठल मोरे, मोठाभाऊ बिरारी, धनसिंग दानरे, अशोक सोनवणे (निकवेल), एन. डी. जाधव (मुंजवाड) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस मुंजवाड पाणीवापर संस्थेचे धर्मा जाधव, दत्तू जाधव, निंबा जाधव, पं.स. सदस्य भास्कर बच्छाव, देवराम टोपले, नारायण सूर्यवंशी, भास्कर बिरारी, सुनील वाघ, प्रल्हाद केल्हे, तुकाराम बागुल, बाजीराव सूर्यवंशी, वटारचे बाळू खैरनार, फकिरा खैरनार, ज्ञानेश्वर खैरनार, चौंधाण्याचे कडू मोरे, बाळू मोरे, शांताराम बागुल, ईश्वर मोरे, देवीदास बागुल, किसन बैरागी, पंढरीनाथ मोरे, आनंदराव मोरे, जिभाऊ मोरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
डाव्या कालव्याची वहन क्षमता वाढवा
By admin | Published: November 03, 2015 10:21 PM