शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सिडको, अंबड भागात गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:56 AM

गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. सिडकोतील मुख्य चौक, उद्यान, शाळा तसेच मोकळ्या जागा असलेल्या भागात रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरू आहे.

सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. सिडकोतील मुख्य चौक, उद्यान, शाळा तसेच मोकळ्या जागा असलेल्या भागात रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरू आहे. महाविद्यालयाच्या बाहेर तसेच शाळेच्या आवारात विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास घडत असून, यामुळे तरुणी, महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या खाकीचा धाक कमी झाला का असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या खाकीचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात सजा भोगत असलेले बहुतांशी गुन्हेगार हे सध्या जामिनावर बाहेर आले असून, यातील काहींना पोलिसांनी तडीपार केले असले तरी अनेक गुन्हेगार सर्रासपणे सिडको तसेच अंबड भागात सध्या राजरोस वावरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे साहजिकच त्यांचा मित्रपरिवारदेखील यामुळे अधिक फार्मात आला असून शाळा, महाविद्यालय परिसरात दररोज विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थिनींमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सिडको भागातील मोकळ्या जागा तसेच उद्यानांमध्ये तसेच शाळा व महाविद्यालयांच्या आवाराचा ताबा या गुंडांनी तसेच मद्यपींनी घेतला असून, नागरीवस्तीतदेखील त्यांची दहशत असल्याने काही नागरिकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनादेखील धमकाविण्याचे प्रकार घडत असल्याने कोणीही नागरिक भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाही.शाळांचे मैदान बनले मद्यपी, गुन्हेगारांचे अड्डेगणेश चौक येथील हनुमान मंदिर परिसर, तुळजाभवानी चौकातील सिद्धिविनायक गार्डन, सिध्देश्वर चौक, स्टेट बॅँक परिसर तसेच सर्व मद्यविक्रीची दुकाने आणि सर्व शाळा व महाविद्यालयत परिसर त्याचबरोबर सर्व क्लासेस परिसर, उपेंद्रनगर, अंबड, राजरत्ननगर, उत्तमनगर महाविद्यालय परिसर, शिवपुरी चौक, शुभम पार्क, पवननगर मटण मार्केट परिसर, पवननगर येथील मैदान यांसह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको व अंबड परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा वावर वाढला असून, याबाबत पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नसल्याने सिडको भागातील मुली व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.स्टेट बॅँक चौपाटीवर चटपटीत पदार्थ खाण्यासाठी सिडको तसेच परिसरातील नागरिक हे कुटुंबासह येत असून यातील काही खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर चक्क मद्य पिण्याचे प्रकार घडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. चौपाटी तसेच मोकळ्या जागा व उद्यानांच्या परिसरात सर्रासपणे मद्य सेवन करून अनेकदा परिसरात दहशत पसरविण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून केले जात आहेत.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोलीस चौक्या फक्त नावापुरत्या उरल्या असून, याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीसच नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. बंद असलेल्या चौक्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय