कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. परिसरात ऊस शेतीचे प्रमाण कमी-जास्त असल्याने शेतकरी ओळखी-पाळखीच्या शेतात जाऊन बांड्या नेण्यासाठी गर्दी करत आहे.ऊस बांड्याला शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. शंभर रुपयात पंधरा ते सतरा भेळे ऊस तोडणारे गाडीवान देतात.परिसरातून ऊस शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कारखान्याला जातो. ऊसतोडणी कामगार दिवाळीपासून परिसरात दाखल झाले आहेत. दुभत्या जनावरांना चारा म्हणून बांडे खाऊ घालतात. यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. परिसरातील दुग्ध व्यावसायिक ऊस बांडे खरेदीला पसंती देतात. ऊस बांडे खरेदी करण्यासाठी सकाळी व सायंकाळी शेतावर गर्दी होत आहे. परिसरातील ऊसतोडणी हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. परिसरात उसाचे क्षेत्र यावर्षी खूप कमी आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस बांड्यांच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:49 PM