नाशिक : महापौराचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसरूळ व परिसरामध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ परिसरातील या वाढत्या आजारांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.म्हसरूळ परिसरात एक वर्षाच्या बालकापासून ते ७० वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच खोकला तसेच सर्दी व ताप या आजाराने ग्रासले असून, घरटी एक रुग्ण तरी सर्दी तसेच खोकल्याचा आढळून येत आहे. म्हसरूळमधील दत्तात्रय सूर्यवंशी, वडजे मळा येथील विशाल वडजे, मनीषा वडजे, हेमंत वडजे, गणेश वडजे, अनिल अपसुंदे, हेमंत वाघ यांना डेंग्यू झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़म्हसरूळमध्ये तीन ते चार दिवस सर्दी, खोकल्याची लागण होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी यामुळे नागरिक रक्त, लघवी तपासून मलेरिया किंवा अन्य साथीच्या आजाराची लागण तर झालेली नाही ना याची खात्री करून घेत आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी होत असून, त्यातच खोकला, सर्दी यामुळे साथीचे आणखी आजार पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, महापौरांच्या प्रभागात आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़
म्हसरूळला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:01 AM
महापौराचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसरूळ व परिसरामध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ परिसरातील या वाढत्या आजारांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
ठळक मुद्देनागरिक भयभीत : महापौरांचा प्रभागखासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी