नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सत्तेत आलेले सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई बेरोजगारीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंबरोबर पेट्रोल, डिजेल, गॅसचे दर वाढले आहे. त्यातच भर म्हणून वीजदर वाढीचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंचवटी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निवेदन देण्यात आले.कृषी वीजदरातदेखील ५ ते ६ टक्के वाढ केल्याने अगोदरच शेतमालाला भाव नाही. अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही, तर काही ठिकाणी दुबार पेरणीच्या संकटांना बळीराजाला सामोरे जावे लागत आहे. सदर दरवाढ अन्यायकारक व जुलमी असून, दरवाढीचा व शासनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष अॅड. सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निषेध नोंदवून वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना सदर दरवाढ मागे घ्यावी, दिल्लीच्या धर्तीवर वीज दर आकारणी करावी, एकलहरा वीज निर्मिती केंद्र नाशिकमधून हलवू नये, केंद्राची वीज निर्मिती क्षमता वाढवावी. ओव्हरहेड वायर्स काढून भूमिगत वायर्स व बंच कंडक्टरचा वापर करावा. जुन्या वायर्सचे जाळे काढावे, वीज बिले रिडिंग घेऊन महिन्याला देयके अदा करावी, असे निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड.सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, मोहिय्योद्दिन हाजी शेख, अरविंद सोनवणे, नामदेव गाडेकर, नासिर पठाण, श्याम तावरे, अॅड. संदीप दंडगव्हाण, शिवाजी घुगे, आशा निकम, उर्मिला शहाणी, आनंद सूर्यवंशी, दिनेश रौंदळ उपस्थित होते.
वाढीव वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:11 AM
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सत्तेत आलेले सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई बेरोजगारीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंबरोबर पेट्रोल, डिजेल, गॅसचे दर वाढले आहे. त्यातच भर म्हणून वीजदर वाढीचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंचवटी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देराष्टÑवादीचे आंदोलन : वीज वितरण कंपनीला निवेदन