शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

कांदा चाळीचे पंचनामे करून अनुदान वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 10:28 PM

कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देकांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात

कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, प्रशांत गायकवाड यांनी, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी कांदाप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी स्थितीत शेतकºयांनी कांद्याचे उत्पादन घेतले. प्रसंगी टँकरच्या पाण्यावर पीक जगवले. मात्र कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यादरम्यान दिवाळी व इतर सण, उत्सव असल्याने अनेक बाजार समित्या काही दिवस बंद होत्या. शेतकºयांनीही कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. कांद्याचा एकरी उत्पादन खर्च ४० हजार रुपयांपर्यंत येतो. सध्या बाजारात कांद्याला मिळणारे दर पाहता शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी तो चाळींमध्ये साठवून ठेवला आहे.हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे. त्यामुळे योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले व चाळीत कांदा साठवून ठेवलेले शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात. कांद्याला अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे दर आणखी गडगडले आहेत. त्यामुळे सरकारने फेब्रुवारी २०१९पर्यंत विक्री केल्या जाणाºया कांद्याला किमान पाच रु पये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उन्हाळी कांदा संपेपर्यंत अनुदान द्या; सरकारकडून तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने संताप कळवण तालुक्यातील गेल्या वर्षी पिकवलेला उन्हाळी (गावठी) कांदा शेतकºयांकडील संपत नाही तोपर्यंत शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाकरे यांच्याकडे लवकरच शेतकºयांचीकैफियत मांडण्यात येणार असल्याचे कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांनी सांगितले.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना तुटपुंजे असे २ रु पये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानातून शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. कांदाविक्री केल्याचा कालावधी अतिशय कमी आहे.