नाशिक - जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात ८२ काेरोनाबाधित आढळले आहेेत. त्यात महापालिका क्षेत्रात ५९ रुग्ण आढळले असले, तरी मुळातच ही संख्या पोर्टलच्या घेाळामुळे वाढली आहे. शनिवारी (दि.२५) केंद्र शासनाचे पोर्टल बंद असल्याने त्या दिवशीच्या रुग्णांची माहिती मंगळवारी (दि.२८) अपलोड झाल्याने ही संख्या वाढल्याचे दिसत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. विशेषत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि नाशिक शहरात ही संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब आहे. मंगळवारी (दि.२८) दिवसभरात ८२ रुग्ण वाढल्याचे आढळले आहे. त्यात नाशिक शहरातील ५९, ग्रामीण भागातील १९ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातील ३, तर जिल्हाबाह्य ३ रुग्णांचा समावेश आहे. मात्र, नाशिक शहरात इतकी संख्या अचानक वाढलेली नाही, असे स्पष्टीकरण कोरोना सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिले. मंगळवारी केवळ ८ रुग्ण आढळले आहेत. उर्वरित रुग्ण हे शनिवारचे आहेत. शनिवारी ४४ रुग्ण नाशिक शहरात आढळले होते. त्यातील ८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर केंद्र शासनाचे पोर्टल बंद पडल्याने उर्वरित नोंदी झाल्या नव्हत्या. त्या नोंदीसह मंगळवारच्या नेांदीमुळे संख्या वाढल्याचे दिसत असल्याचे डॉ. पलोड यांनी सांगितले.
पोर्टलच्या घेाळामुळे काेरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 1:34 AM