देवळा : देवळा तालुक्यात एकाच दिवसात कोरोनाचे २५ रूग्ण सापडल्यामुळे तालुक्यात एकूण रु ग्णाची संख्या ७५ झाली आहे. देवळा शहरातील कोरोना आटोक्यात येत असतांना शहरासह ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील ७० संशयित व्यक्तिचे स्वाब तपासणीचे अहवाल रविवारी प्राप्त झाले, त्यापैकी २५ अहवाल पॉझीटीव्ह आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे. यात देवळा शहरातील ८, वसाका येथील ७ पॉझीटिव्ह रूग्णांचा समावेश आहे.भऊर, खामखेडा, खालप,लोहोणेर, सावकी येथे प्रत्येकी एक रूग्ण पॉझीटिव्ह सापडला आहे. वाजगाव येथे एकाच कुटुंबातील पाच व्यक्तिचे अहवाल कोरोना पॉझटिीव्ह आले आहेत. शुक्र वारी (दि. २४) वाजगाव येथे एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळल्यानंतर वाजगाव वडाळे गृपग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील, ग्रामकोरोना समितीचे सदस्य आदींनी गावात ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी कोरोनाला प्रतिबंध करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी रविवार ते गुरूवार असे चार दिवस जनता कफर्यु पाळण्याचा निर्णय यावेळी घेतला.गावातील नागरिकांनी मास्क वापरणे बंधन कारक असुन विना मास्क व्यक्ती आढळल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.चार दिवसांच्या या कालावधीत सर्व व्यावसायिकांनी व नागरिकांनी सदर जनता कर्फ्यूस सहकार्य करून कोरोनाबाबत होणाऱ्या वाढत्या संक्र मणास रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामकोरोना समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (फोटो २६ देवळा)**** देवळा शहर कोरोना मुक्त झाले अशी नागरीकांमध्ये चर्चा सुरू असतांनाच शहरात पुन्हा कोरोनाचे रूग्ण सापडू लागले आहेत. यामुळे नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारी यांनी दिलेल्या आदेशानुसार देवळा नगरपंचायतीत मंगळवार दि. 21 रोजी मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली. यावेळी शहरातील नगरपंचायतीच्या प्रत्येक प्रभागात देवळा शहर सुरक्षा समतिीची स्थापना करण्यात आली. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक तसेच त्यास सहाय्यक म्हणून वसुली कर्मचारी, आशा वर्कर, व आंगणवाडी सेविका अशी चार सदस्यांची समतिी त्या प्रभागात बाहेरगावाहून येणार्या नागरीकांवर लक्ष ठेवणार आहे.
देवळा तालुक्यात कोरोना रु ग्ण संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:09 PM
देवळा : देवळा तालुक्यात एकाच दिवसात कोरोनाचे २५ रूग्ण सापडल्यामुळे तालुक्यात एकूण रु ग्णाची संख्या ७५ झाली आहे. देवळा शहरातील कोरोना आटोक्यात येत असतांना शहरासह ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देचिंतेचे वातावरण : चार दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय