मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. सध्या १०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ७८ वरून प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता ९५ झाली आहे.स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकाºयामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू होती. मात्र गेल्या दोन दिवसात शहरातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथील मसगा महाविद्यालयासह इतर कोविड सेंटरमध्ये सद्यस्थितीत १०१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर महापालिकेनेही कंटेन्मेंट व बफर्स झोनमध्ये वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात ७८ प्रतिबंधित क्षेत्र होते तर आता ९५ क्षेत्र झाले आहेत. मालेगाव शहरात आतापर्यंत एक हजार ३२८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी १ हजार ५७ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
मालेगावी कोरोना रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 9:45 PM
मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. सध्या १०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ७८ वरून प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता ९५ झाली आहे.
ठळक मुद्देगेल्या आठवड्यात ७८ प्रतिबंधित क्षेत्र होते