नाशिक : शहरात अखेरीस डेंग्यूने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जुलै महिन्यात तीस रुग्ण आढळल्याने महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. याशिवाय स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येतदेखील वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात तीन रुग्ण होते. जुलै महिन्यात आणखी सहा रुग्ण आढळले आहेत.दरवर्षी पावसाळ्यात रोगराईचे आव्हान असते. यंदा जून महिन्यापर्यंत डेंग्यू नियंत्रणात होता. जानेवारी महिन्यापासून जून अखेरपर्यंत अवघे पंधरा रुग्ण होते त्यामुळे महापालिका सावध होती. मात्र हळूहळू जुलैमध्ये ही संख्या वाढली असून, केवळ जुलैतच ३० रुग्ण आढळल्याने यंत्रणा सावध झाली आहे. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत ४५ रुग्ण आढळले असले तरी आता पावसाळा असल्याने संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत अडीचशेहून अधिक रुग्ण होते. त्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी आता याच कालावधीत रोगराई वाढत असल्याने धोका वाढला आहे.
शहरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:15 AM