नाशिक : कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना एनआयव्हीकडून प्राप्त झालेल्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात ब्रिटनसह अन्य पाच देशांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्येही आढळून आल्याचे संकेत मिळाले होते; परंतु आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार कोणत्याही नमुन्यांत हे भिन्न स्ट्रेन नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता, प्रशासनाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या २६ नमुन्यांपैकी ३० टक्के नमुन्यांमध्ये दुबई आणि ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, रात्री उशिराने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे भिन्न स्ट्रेन नसल्याचा खुलासा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, एनआयव्हीकडून जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामध्ये ब्रिटन, दुबई, कॅनडा, सौदी अरेबिया बेस, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आदी भागांचा संबंध असल्याचे संकेत दिले गेले होते. पुढील कार्यवाहीसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून मार्गदर्शन मागविले होते. n जिल्ह्यात सध्या १० हजार ८५१ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे महापालिका क्षेत्रात आहेत, तर १८ टक्के रुग्ण ग्रामीण भागात आहेत. मालेगावमध्येही ७१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. n संसर्ग पसरू नये यासाठी ९० टक्के रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ मार्चपासून रुग्णसंख्या वाढीचा वेग सुरू झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढतच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकाच दिवशी दोन हजारांपर्यंत रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.प्रधान सचिवांचे मार्गदर्शनआरोग्य खात्याच्या सचिवांकडून मागविलेल्या मार्गदर्शनात व्हीओसी व्हीयूआय (तपासणी अंतर्गत चलनाचे व्हेरिएंट) दिसून येत नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही नमुन्यात यूके, दक्षिण आफ्रिकन किंवा ब्राझिलियन स्ट्रेन नाही. बदलांच्या ज्या विशिष्ट क्रमात जेनोम असणे आवश्यक आहे, ते या नमुन्यात नाही. म्हणूनच हे भिन्न स्ट्रेन नसल्याचा निष्कर्ष निघत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमधील रुग्णसंख्येतील वाढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 1:49 AM
कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना एनआयव्हीकडून प्राप्त झालेल्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात ब्रिटनसह अन्य पाच देशांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्येही आढळून आल्याचे संकेत मिळाले होते; परंतु आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार कोणत्याही नमुन्यांत हे भिन्न स्ट्रेन नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.
ठळक मुद्देयुकेतील नवा स्ट्रेन नसल्याचा निर्वाळा