नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि. ३१) अचानकपणे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असून, नाशिक ग्रामीणला रुग्णांमध्ये १३४ इतकी वाढ झाली असून शहरात ४४ तर जिल्हाबाह्यला ११ याप्रमाणे एकूण नवीन रुग्णसंख्या १९० पर्यंत पोहोचली आहे. तर, जिल्ह्यात ११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५१३ वर पोहोचली आहे.
शनिवारी गेलेल्या बळींपैकी ३ नाशिक ग्रामीणचे आणि १ नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. जिल्ह्यातील उपचारार्थी संख्येत शनिवारी पुन्हा भर पडली असून एकूण उपचारार्थी संख्या ११०५ वर पोहोचली आहे. त्यात ६०३ नाशिक मनपातील, ४४२ नाशिक ग्रामीणचे तर ५३ मालेगाव मनपाचे आणि जिल्हाबाह्यचे ७ रुग्ण आहेत. दरम्यान जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णसंख्या ४ लाख २ हजार ५८७ तर कोरोनामुक्तची संख्या ३ लाख ९२ हजार ९६९ वर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या एकूण बळींमध्येदेखील अद्यापही नाशिक ग्रामीणची बळीसंख्या सर्वाधिक म्हणजे ४०८७ इतकी असून नाशिक मनपा क्षेत्रातील ३९४३, मालेगाव मनपातील ३५७ तर जिल्हाबाह्य १२६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११०५ उपचारार्थींपैकी ६०३ नाशिक मनपा, ४४२ नाशिक ग्रामीणचे तर ५३ मालेगाव मनपाचे आणि ७ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत निगेटिव्ह आलेल्या अहवालांची संख्या तर १८ लाख ५८ हजार ७८८ वर पोहोचली आहे. म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी चारपैकी एका व्यक्तीने कोरोनाच्या संशयापोटी टेस्ट करून घेतली असून ती निगेटिव्ह आली आहे.
इन्फो
प्रलंबितमध्येही ग्रामीणची आघाडी
जिल्ह्याच्या प्रलंबित अहवालांची संख्यादेखील तब्बल १६४९ वर पोहोचली आहे. त्यातही सर्वाधिक प्रलंबित अहवालांची संख्या १२१६ वर पोहोचली असून मालेगाव मनपाचे २७६ तर नाशिक मनपाचे १५७ रुग्ण आहेत. प्रलंबित रुग्णांमध्ये होणारी आणि त्यातही ग्रामीणचे अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, त्यातील अहवाल बाधित येण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.