वणी : येथील उपबाजारात बुधवारी सहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. ३१९ वाहंनामधून कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता.८७० रु पये कमाल ३०० रु पये किमान तर ६३५ रु पये सरासरी प्रती क्विंटल दर उत्पादकांना मिळाला. तर लहान आकारमानाच्या कांद्याला ६६८ कमाल २०० रु पये किमान तर ५०१ रु पये सरासरी प्रती क्विंटल दराने कांदा व्यापार्यांनी खरेदी केला. कांद्याच्या दरातील घसरण उत्पादकांची चिंता वाढविणारी आहे.खुडणीपासुन वाहतुक विक्र ीचा हिशोब केला तर उत्पादन खर्चही निघणे अवघड असल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.दरम्यान, कृषी उत्पादनाला वाहतुकीसाठी शिथीलता असलीतरी परराज्यात तसेच राज्यांतर्गतविक्र ीसाठी पाठविण्यात येतअसलेले ट्रक वेळेवर खालीहोतीलच याची शाश्वती नसल्याने ट्रान्सपोर्ट व व्यापारी या दोघांना ही बाब अडचणीची ठरु लागल्याने कांदा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीवर याचा प्रतिकुल परिणाम होतो आहे. जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये अजूनही व्यवहार बंद आहेत.-----------------------------ब्राह्मणगाव : कोरोना व्हायरसमुळे शेतीसह सर्वच कामकाज अडचणीत सापडले असून त्यामुळे सर्व अर्थ कारण ही ठप्प झाले आहे . मोठ्या प्रयत्नाने शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन केले. त्यात कांदा भावाची मोठी घसरण झाली असताना पुन्हा बाजार समित्यांनी कांदा विक्र ी बंद केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकºयांची आर्थिक अडचण समजून व्यवस्थित नियोजन करून पुन्हा कांदा विक्र ी मार्केट सुरू करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी बंडू अहिरे ंयांचेसह शेतकºयांनी केली आहे.
वणीत कांद्याच्या आवकेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 9:01 PM