नांदूरशिंगोटे : लॉकडाउनमुळे आता ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी आॅनलाइन सुविधांचा अवलंब केला आहे. पैसे पाठविण्यासाठी विविध अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे.कोरोना संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी असल्याने नागरिक घरातच थांबून असल्याने अनेकांना मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांशी भेटच होत नसल्याने नाते किंवा संबंध जपण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग सुविधांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.कोणतीही वस्तू बाजारात जाऊन खरेदी करण्याचा ग्रामीण भागातील नागरिकांचा कल असतो, परंतु आता ग्रामीण भागातील तरुणाईचा वस्तू घरी आॅनलाइन मागण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर होत असल्याचे दिसून येते. व्यवहार व कुरियर सेवाही बंद आहे. सध्या लॉकडाउनमुळे कंपन्यांचे व्यवहार व कुरियर सेवाही बंद आहे. आता स्मार्टफोनच्या साहाय्याने होत असलेल्या आॅनलाइन व्यवहारांनी त्यासाठी मार्ग शोधून काढला आहे. मित्र, नातेवाईक व व्यवहारासाठी पैसे पाठविण्यासाठी आता बँकेत जाणे टाळून घरूनच आॅनलाइन व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे.ज्या सुविधा घरपोच उपलब्ध होतील त्यासाठी आॅनलाइन बुकिंग करून पैसेही आॅनलाइन पाठविणे मोबाइलमधील इंटरनेटच्या सेवेच्या माध्यमातून सुरू आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने मार्किंग करून दिले आहे, परंतु त्या मार्किंगचा उपयोग पाहिजे तसा होताना दिसत नाही. या संकटकाळी स्मार्ट फोन एक वरदान ठरत असून, नातेवाइकांनी व्हिडीओ कॉलिंग करून त्यांच्या अत्यंत जवळ असल्याची जाणीव स्मार्ट फोन या लॉकडाउनच्या काळात करून देत आहे.------------------------भाजीपाला, किराणा माल आदींबरोबरच पेपर बिल, केबल, इलेक्ट्रॉनिक अशा अत्यावश्यक वस्तू पुरविण्याची सोय आता व्यावसायिकांनी सुरु केली आहे. त्यामुळे त्याचा लाभ आता नागरिक घेत असून, यासाठी बँकिंग व्यवहार आॅनलाइन केले जात आहे. या लॉकडाउनमध्ये फक्त स्वत:च्या खात्यात बँकेत जाऊन पैसे जमा करण्यापुरतेच जाऊन इतर सर्व व्यवहार आॅनलाइनच्या माध्यमातून केले जात आहे.