प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडून केला जात आहे. दरम्यान, हिरेन आणि सुभद्रा या दोघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन एकाच डॉक्टरकडून करण्यात आल्याचे निपुंगे यांचे म्हणणे आहे. सुभद्राचा खून दडपण्यात येऊन तिने गळफास घेतल्याचे भासवून आत्महत्येचे स्वरूप देत त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले गेले आणि ऑन कॅमेरा झालेल्या शवविच्छेदनाच्या चित्रीकरणाची सीडीदेखील गायब करण्यात आल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे. निपुंगे यांच्या छळाला कंटाळून सुभद्रा यांनी २०१७ साली आत्महत्या केल्याचे दाखविले गेले आणि या प्रकरणात परमवीरसिंग यांच्या सांगण्यावरून त्यांना गोवण्यात आल्याचे निपुंगे यांनी सांगितले.
--इन्फो--
ॲक्ट्राॅसिटी कायद्यान्वये कारवाईची मागणी
खोट्या गुन्ह्यात अडकविणे, न्यायालयात खोटे पुरावे सादर करणे, मूळ गुन्हा दडवून गुन्ह्याचे स्वरूप बदलून त्यानुसार दोषारोपपत्र दाखल करणे तसेच अनुसूचित जमातीचे अधिकारी म्हणून छळ करणे असे विविध आरोप निपुंगे यांनी त्यांच्या तक्रारीत केले आहे. यानुसार ॲक्ट्राॅसिटी कायद्यानुसार संबंधित तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्यासह संशयित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे.
--इन्फो--
...असा आहे निपुंगे यांचा प्रवास
श्यामकुमार निपुंगे हे राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून १९८८ साली पोलीस दलात भरती झाले. त्यांची पहिली नेमणूक मुंबईच्या रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात झाली. त्यांची सहायक निरीक्षक म्हणून मुंबईच्या विशेष सुरक्षा विभागात पदोन्नतीने बदली करण्यात आली. २००१ साली मुंबई सुरक्षा विभागात पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली. त्यानंतर ठाणे ग्रामीणमधील मीरारोड पोलीस ठाण्याची सूत्रे निपुंगे यांच्याकडे सोपविली गेली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मुंबईच्या विशेष शाखेचा कारभार त्यांनी सांभाळला. १६ जून २०१३ साली निपुंगे यांना उपअधीक्षक पदावर त्यांना पुणे लोहमार्ग येथे पदोन्नती मिळाली. तेथून ते पुन्हा ठाणे महापालिकेत २०१५ साली सहायक पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. २०१६ साली भिवंडी येथील वाहतूक विभागात सहायक आयुक्त म्हणून ते कर्तव्यावर असताना त्यांनी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली असता परमवीरसिंग यांनी त्यांची तडकाफडकी बदली ठाणे मुख्यालयात केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी सुभद्रा पवार यांच्या आत्महत्येच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे.
060721\06nsk_24_06072021_13.jpg
शामकुमार निपुंगे