शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

साथीच्या आजारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:03 PM

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याबाबत उदासीन असल्याने खासगी दवाखाने, सरकारी दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढली आहे.

ठळक मुद्दे दवाखान्यांमध्ये गर्दी : इगतपुरी, पेठ तालुक्यात उघडिपीनंतर वाढले रु ग्ण

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याबाबत उदासीन असल्याने खासगी दवाखाने, सरकारी दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढली आहे.घोटी शहरातील कचरा महामार्गालगत फेकला जातो. या कचºयाची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ओला-सुका कचरा आणून टाकला जात असून, परिसरात दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. यासह डासांचे प्रमाणही चिंताजनक वाढले आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हवेतील संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ग्रामीण भागातही विविध रुग्णांची संख्या वाढल्याने त्यामुळे भीती व्यक्त होत आहे.कचºयाच्या ठिकाणी भटकी कुत्रीही गोळा होतात.त्यामुळे त्यांचाही येणाºया - जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेकवेळा कुत्री मागेही लागतात. त्यामुळे त्यांच्याकडेमोठा धोका आहे. मासळी मार्केट ठिकाणी गलिच्छ जागेत आणि गटारावर डास वाढले असून, दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.तुंबलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, त्वचाविकार यांनी नागरिकांना घेरले आहे. पाणी तुंबलेल्या भागात संसर्गजन्य तापाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.पावसानंतर थंडीताप,अतिसार, मलेरिया, टायफॉइड तसेच रक्तातील पेशींचे कमी अधिक प्रमाण यामुळे सगळीकडे समाज आजारी आहे.पावसानंतर आता सूर्यनारायण दर्शन देत असून, शेतीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातच आजारपणामुळे खतांसाठी पैसे कमवायचे की औषधासाठी पैसे द्यायचे, हा पेचप्रसंग सामान्य शेतकºयांना पडला आहे.पावसानंतर आरोग्य व्यवस्थेसमोर यामुळे आव्हानउभे राहिले आहे. रोगराई निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.थंडीताप, सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढपेठ : तालुक्यात झालेल्या पावसाच्या उघडिपीनंतर बदललेल्या हवामानामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, थंडीतापाच्या रु ग्णांत मोठी वाढ झाली आहे. पेठ येथे ग्रामीण रु ग्णालय असून, तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय असल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या दाखल होत आहेत. त्यात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर ताण पडत असून, ग्रामीण रुग्णालयात रांगा लागत आहेत. थंडीताप, डेंग्यूसारखे आजार वाढत आहेत.नागरिकांनी थंडी-तापासारखी लक्षणे आढळल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे. जेणेकरून मलेरिया-टायफॉइडसारखे आजार टाळता येतील. पाणी उकळून प्यावे अथवा पाण्यात निर्जंतुकीकरण करणारे ड्रॉप वापरावे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.- पंढरीनाथ काळे,ग्रामस्थ, पिंपळगाव मोरइगतपुरी तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढलेले नाही. नियमित स्वरूपातील रु ग्णांची संख्या स्थिर आहे. स्वच्छता आणि पाणी याची काळजी घेतल्यास आजारांवर नियंत्रण मिळविता येते. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्कअसून, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचारी सतर्क आहे.- डॉ. एम.बी. देशमुख,आरोग्य अधिकारी, इगतपुरीआजाराच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजीकचरा शक्यतो उघड्यावर टाकू नये.निकामी टायर, बाटल्या, करवंट्या, भंगार निकाली काढा.पाण्याच्या टाक्यांना झाकणे लावा.गच्चीवर साचलेले पाणी काढा, परिसरातील डबकी बुजवा.जनावरांच्या गोठ्याशेजारी धूर करावा.