नाशिक : कांदा दरात झालेली घसरण व त्यातून गावोगावी सरकारविरुद्ध शेतकºयांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकºयांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतकºयांनाच पात्र ठरविले. परंतु आता त्या मुदतीत आणखी पंधरा दिवसांनी वाढ करण्यात आली असून, नवीन निर्णयानुसार ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतकºयांनाही सरकारच्या या मदतीचा लाभ दिला जाणार आहे.जिल्ह्णात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा मातीमोल भावात शेतकºयांना विक्री करावा लागला. अनेक शेतकºयांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्च देखील निघाला नाही, तर अनेकांनी चाळीतच कांदा ठेवणे पसंत केले. सरकारने मुदतवाढ दिली असली तरी, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात पंधरा दिवस जिल्ह्णातील बाजार समित्या दिवाळी सणामुळे बंद होत्या. त्यामुळे शेतकºयांसाठी कांदा विक्रीसाठी कमी कालावधी मिळाला. मुळात आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली कांदा घसरण जानेवारीपर्यंत कायम असून, सरकारचा विशिष्ट कालावधीसाठी अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.- राजेंद्र डोखळे, शेतकरी नेते
कांदा अनुदानाच्या कालावधीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:52 AM
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे २०० क्विंटल प्रति शेतकरी अनुदान मंजूर करण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत कांदा विक्री करणाºया शेतकºयांनादेखील ते देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : ३१ डिसेंबरपर्यंत विक्रीची मुभा