नाशिक : गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटपर्यंत पोहचण्यास अनेक अडचणी येत असून, बाजार पेठेत भाजीपाल्याची आवक घटत आहे. परिणामी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे किरकोळ बाजारात मेथीच्या भाजीला ४० रुपये भाव मिळत आहे.मागील दहा दिवसांपूर्वी भाज्यांचे दर आटोक्यात होते, पण या आठवड्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांची आवक घटली असून, परिणामी याचा फटका भाज्यांच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या जेवणातून भाजीपाला गायब होत आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करताना विचार करून भाजी विकत घेत आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, टमाट्याचे यांचे भाव वाढले असल्याने ग्राहक या भाज्यांकडे दुर्लक्ष करत इतर भाज्या घेण्यातच समाधान मानत आहे. भेंडी, चवळीच्या शेंगा, वांगे, गवार, दुधी भोपळा, दोडका, फ्लावर,कोबी, पालक यांचे दर कायम आहे. आवक पुन्हा वाढल्यास भाव पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.भाजीपाल्यांचे दर :मेथी : ४० ते ५० जुडी, शेपू : २० ते २५ जुडी, पालक : ५ ते १० जुडी, मिरची : ४० ते ६० किलो, वांगी : १५ ते २० किलो, फ्लॉवर १५ ते २० किलो, कोबी : १५ ते २० किलोे, दोडका : ५० ते ६० किलो, काकडी : ३० ते ४० किलो, भेंडी : ४० ते ६० किलो, गवार : ४० ते ६० किलो, कारले : ४० ते ६० किलो, कांदा : १० ते १५ किलो, बटाटा : १५ ते २० किलो, टोमॅटो : ३० ते ४० किलो, भोपळा : १० ते १५ नग, लसूण : १०० ते १५० किलो.
भाज्यांच्या किमतीत वाढ; मेथी ४० रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:49 AM
गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटपर्यंत पोहचण्यास अनेक अडचणी येत असून, बाजार पेठेत भाजीपाल्याची आवक घटत आहे. परिणामी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे किरकोळ बाजारात मेथीच्या भाजीला ४० रुपये भाव मिळत आहे.
ठळक मुद्देआवक घटली : भाव गगनाला भिडले