शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

तलावाची साठवण क्षमता वाढवा

By admin | Published: September 29, 2015 11:29 PM

३८ गाव पाणी योजना : भुजबळ यांच्या बैठकीत सूचना

येवला : येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारात ५५ गावाचा समावेश होणार यासाठी साठवण तलावाची क्षमता वाढावी, नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण २१ गावांना शाश्वत पाणी मिळावे. या योजनेचा समावेश पंचायत समिती कृती आराखड्यात करावा याबाबत नाशिक येथे बैठक संपन्न झाली. येवला तालुक्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभारलेल्या ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७ नोव्हेंबर २००९ रोजी तत्कालीन जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार छगन भुजबळ यांचे हस्ते ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची चाचणी करून त्या अंतर्गत येवला तालुक्यातील टँकर ग्रस्त २३ गावे व उर्विरत १५ गावे असे एकूण ३८ गावांना पाणीपुरवठा सुरु केला गेला. सन २०१६ मधील १ लाख ९ हजार ६०० लोकसंख्या व सन २०३१ मधील १ लाख ४२ हजार ६०० लोकसंख्या असा अंतरिम टप्पा मानून दरडोई ५५ लिटर पाणी दिले जाते. दरम्यान ३८ गाव पाणीपुरवठा समिती स्थापन होऊन हि योजना १ एप्रिल २०१२ पासून आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समिती अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, व सहकारी ही योजना सक्षम पणे राबवित आहे. यंदा कमी पर्जन्यमान असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मूळ ३८ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत टंचाई ची सात गावे समाविष्ठ झाली. अशा ४५ गावांना पाच दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले गेले. नियमित पाणीपट्टीदेखील वसूल करण्यात येते. याशिवाय चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, सातारे, कोळम बु., मुरमी, बाळापुर, वाईबोथी, कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रुक, बोकटे, देवळाणे, अनकाई, घुलेगाव, अंगुलगाव, तांदुळवाडी, गुजरखेडे, खैरगव्हाण अशा एकूण १७ गावांनी ठरावाद्वारे मागणी करून या योजनेत आम्हाला समाविष्ट करून घ्यावे असा आग्रह धरला आहे. तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, रहाडी, पिंपळखुटे, पन्हाळ साठे, वाघाळे, सोमठाण जोश, आहेरवाडी, कोळम, पांजरवाडी, हडप सावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडे, धामणगाव, या अवर्षणप्रवण क्षेत्रातील २० गावांना शाश्वत पाणीपुरवठा योजना नाही. व या गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून योजना प्रस्तावित करावी अशा सूचना आमदार छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, कळमकर, मोहन शेलार, प्रकाश वाघ, महेश पैठणकर, डी.जी. सपकाळे, उत्तम घुले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)